Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा मराठा क्रांती मोर्चा; 9 ऑगस्टचा दिला अल्टिमेटम 

180

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवावा या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मार्चाच्या वतीने रविवारी, २३ जुलै रोजी कायगाव टोका येथे रस्ता रोको आंदोलन केले. 9 ऑगस्ट क्रांती दिनापूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईला आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी रमेश केरे पाटील यांनी दिला. तसेच सरकारच्या वेळखाऊ धोरणाविरोधात निदर्शने देण्यात आली. आक्रोशही व्यक्त केला.

गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी 40 वर्षांपासून आरक्षणासाठी सकल मराठा समाज संघर्ष करत आहे. सर्वच पक्षांनी सत्ता उपभोगली. मात्र, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. यामुळे मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. त्याचा भडका 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात उमटला होता. त्यानंतर 58 मुक मोर्चे निघाले. काँग्रेस व भाजप सरकारने आरक्षण दिले. त्रूटी असल्याने तेही सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. आता पुन्हा आयोग नेमून सर्वेक्षण केले जात आहे. सरकारच्या वतीने वेळखाऊ धोरण सुरु असल्याने मराठा तरूणांचा संयम सुटत चालला असून मुंबई येथे आंदोलन सुरु आहे.

(हेही वाचा Asaduddin Owaisi : ना राहुल गांधी, ना ममता बॅनर्जी, ना अखिलेश यादव मुसलमानांचे सहानुभूतीदार; काय म्हणाले ओवैसी?)

तर 27 जुलै रोजी मराठा क्रांती ठोक मार्चा, सकल मराठा बांधवांच्या वतीने कायगाव टोका येथे रस्ता रोको आंदोलन करून 9 ऑगस्ट पूर्वी सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबई येथे गनीमी काव्याने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा केरे पाटील, किशोर शिरावत आदींनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.