BodyBuilder : ९० वर्षांचे आजोबा आहेत बॉडीबिल्डर; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलंय नाव

166

अमेरिकेतील जिम अरिंगटन नावाच्या वृद्धांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध बॉडीगार्ड म्हणून नोंद झाली आहे. अरिंगटन हे सेवानिवृत्त सेल्स प्रोफेशनल आहेत. 2015 साली त्यांना जगातला सर्वात वयोवृद्ध बॉडीगार्ड म्हणून मान मिळाला होता. तेव्हा त्यांचं वय 83 वर्षे होतं. तो मान आजही कायम टिकून आहे. आपली शरीरयष्टी डौलदार बनविण्यासाठी अरिंगटन यांनी बरीच दशके प्रचंड मेहनत घेतली आहे.

आजही अरिंगटन हे वेगवेगळ्या शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकत आहेत. हल्लीच अरिंगटन यांनी रेनो, नावेदा या ठिकाणी आयएफबीबी स्पर्धेत भाग घेतला होता. तिथे ते 70 वर्षे वयाच्या वरच्या गटात तिसऱ्या क्रमांकावर होते. तर 80 वर्षे वयाच्या गटामध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. यावरूनच हे लक्षात येते की, आजही अरिंगटन आपले शरीर सुदृढ आणि डौलदार राहावे यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. अरिंगटन यांनी हल्लीच एका मेन्स हेल्थ मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे.

अरिंगटन यांचा जन्म जन्मवेळेच्या दीड महिना अगोदर झाला होता. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. जन्माच्या वेळी त्यांचे वजन पाच पौंड म्हणजेच अडीच किलो इतके होते. त्यांना अस्थमाचा आजार जडला होता. त्याव्यतिरिक्त लहानपणी ते सतत आजारी असायचे.

(हेही वाचा Government Report : घरापासून दूर असल्यावर 56% मुली ठेवतात शारीरिक संबंध; सरकारच्या धक्कादायक अहवाल)

वयाच्या पंधराव्या वर्षी अरिंगटन यांनी ठरवले की, हे सगळं आता थांबायला हवं. त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यायची तयारी ठेवावीच लागेल आणि त्यांनी त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली. व्यायाम करायला सुरुवात केली. त्यांना लहानपणी आपण सुपरहिरो व्हावे असे वाटायचे.

सुपरहिरो सारखी शरीरयष्टी कमावण्यासाठी अरिंगटन यांनी जी मेहनत घ्यायला सुरुवात केली ती आजतागायत सुरू आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आले म्हणून अरिंगटन यांनी आपला व्यायाम कधीच थांबवला नाही. आजही ते वेगवेगळ्या ठिकाणच्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेत असतात आणि जिंकतातही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.