गोंदियामध्ये एका व्यावसायिकाची ५८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीने बनावट सट्टेबाजी अॅप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून नागपूरच्या एका व्यावसायिकाला तब्बल ५८ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली.
नागपूर पोलिसांनी काका चौकातील रहिवासी असलेल्या आरोपी बुकीच्या घरावर छापा टाकून सुमारे 17 कोटी रुपये रोख, सुमारे 4 किलो सोने आणि 200 किलो चांदी जप्त केली. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या छाप्यापूर्वीच आरोपी घरातून पळून गेले. त्याच्या शोधासाठी छापे टाकण्यात येत आहेत.
ऑनलाइन जुगारात 58 कोटी 42 लाख रुपये गमावल्यानंतर नागपूरच्या व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. कारवाई करत पोलिसांनी आरोपी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याच्या गोंदिया येथील घरावर छापा टाकला. सोंटूच्या घराच्या झडतीत 14 किलो सोने आणि 200 किलो चांदीसह 17 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. यातील बहुतांश सोने हे बिस्किटांच्या स्वरूपात आहे. जप्त केलेली चांदी आणि रोख रक्कम ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मोजणी सुरू केली असून, ही मालमत्ता किती आहे, हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही.
Join Our WhatsApp Community