Devendra Fadanvis : अखेर फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधी मागील उद्देश सांगितलाच; म्हणाले… 

113

जेव्हा उद्धव ठाकरे तुमच्यापाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा तुम्हाला अजित पवार यांना सोबत घेऊन शपथ घ्यावीच लागते. नाही तर उद्धव ठाकरेच यशस्वी होतात. पाठीतला खंजीरच यशस्वी होतो. त्यामुळे माझ्या पाठीतील खंजीर काढून मी ताठ उभा राहू शकतो. तुमचा मुकाबला करू शकतो. तुम्हाला घरी पाठवू शकतो हे दाखवून द्यावे लागते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९मध्ये पहाटेच्या शपथविधीमागील उद्देश सांगितला.

आजही उद्धव ठाकरे, त्यांचे कार्यकर्ते आणि एनसीपीच्या ट्रोलर्सना माझे ओपन चॅलेंज आहे, आमच्या विरोधातील एक गोष्ट जरी तुमच्यासमोर असेल तर ती समोर घेऊन या…एक गोष्ट आणा मार्केटमध्ये. ओपन चॅलेंज आहे, असे आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवारांनी आपल्या गटातील आमदारांना 25-25 कोटींचा निधी वाटला. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये कोलित टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेच्या आमदारांनाही (शिंदे गट) आमदारांनाही निधी मिळाल्याचे सांगून शिंदेगटाच्या आमदारांनी समाधान व्यक्त केले. निधी वाटताना अजित पवारांनी भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघासाठी निधी दिला का?, असा प्रश्न विचारला त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली आणि सत्तेतील तिन्ही पक्षाच्या आमदारांना निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा India : 12 वर्षांत 17.5 लाख  भारतीयांनी सोडले नागरिकत्व; काय म्हणाले परराष्ट्रमंत्री? )

1500 कोटींची तरतूद

विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना निधी दिला नाही. तर भाजप शिवसेनेच्या आमदारांनाही निधी दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावर निधीला घेऊन आरोप करणे योग्य नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.