Landslide : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दोनवेळा दरड कोसळली; काही वेळासाठी वाहतूक ठप्प

आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी उपस्थित असून लगदा काढण्याचे काम सुरु आहे.

175
Landslide : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दोनवेळा दरड कोसळली; काही वेळासाठी वाहतूक ठप्प

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत तर काही ठिकाणी (Landslide) दरड कोसळली आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे महामार्गावर सलग दोन वेळा दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ रविवार २३ जुलैच्या रात्री साडेदहाच्या सुमारास पहिली दरड (Landslide) कोसळली, तर सोमवार २४ जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा जवळ एक (Landslide) दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबईला येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आता मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन सुरु करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Twitter : ट्विटरची ओळख बदलणार; ‘ब्लू बर्ड’ ऐवजी ‘हा’ नवा लोगो असणार)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे आडोशी गावच्या हद्दीत मुंबई जवळील लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून (Landslide) मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेनवर पडलेला आहे. हा मातीचा लगदा आता आयआरबीच्या जेसीपी, डंपरच्या साहाय्याने हटवण्याचे काम सुरु आहे. साधारणतः २० ते २५ डंपर लगदा रोडमध्ये पडलेला आहे. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी उपस्थित असून लगदा काढण्याचे काम सुरु आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील दुसरी दरड (Landslide) ही तुलनेने पहिल्या दरडपेक्षा लहान होती. या दरडीमुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, ही वाहतूक आता सुरु झाली आहे. असं यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.