Women’s Safety : महिलांची सुरक्षितता धोक्यात; राज्यात महिलांच्या अपहरणात २२ टक्क्यांनी वाढ

महिलांवरील अत्याचाराच्या संबंधित दाखल झालेल्या गुन्ह्यात २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये तब्बल ११ टक्क्यांनी वाढ झाली.

191
Women's Safety : महिलांची सुरक्षितता धोक्यात; राज्यात महिलांच्या अपहरणात २२ टक्क्यांनी वाढ

गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या एका अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार राज्यातील (Women’s Safety) महिला अजूनही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. मागील एका वर्षात राज्यातील महिलांच्या अपहरणात २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील कायदा व सुव्यवस्था (Women’s Safety) या मुद्द्यावर चर्चा होणार असून त्याच पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून एक अहवाल जारी करण्यात आला. या अहवालात बलात्कार, अपहरण, विनयभंग, छेडछाड, हुंडाबळी, अमली पदार्थ, बनावट नोटा, इत्यादी विषयांची माहितीदेखील मांडण्यात आली आहे.

(हेही वाचा – Landslide : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दोनवेळा दरड कोसळली; काही वेळासाठी वाहतूक ठप्प)

अल्पवयीन मुलींचे अपहरण सर्वाधिक

राज्यातील महिलांच्या अपहरणाच्या (Women’s Safety) प्रकरणात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण अधिक आहे. मागील चार वर्षांत ३ हजार ४८७ महिलांच्या अपहरणाची नोंद झाली. त्यामधील १८ वर्षांखालील ३ हजार ४५९ मुलींचा समावेश आहे.

या अपहरणाच्या (Women’s Safety) गुन्ह्यामधून बहुतांश आरोपींची निर्दोष सुटका झाली असून, न्यायालयात आतापर्यंत केवळ ३३ गुन्ह्यांची सुनावणी झाली आहे. या ३३ मधील २८ जण निर्दोष सुटले आहेत. आतापर्यंत केवळ ५ जणांना शिक्षा झाल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.

महिलांवरील अत्याचारात ११ टक्क्यांनी वाढ

महिलांवरील अत्याचाराच्या (Women’s Safety) संबंधित दाखल झालेल्या गुन्ह्यात २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये तब्बल ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गृह विभागाच्या अहवालानुसार महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये (Women’s Safety) जून २०२२ अखेर ते जून २०२३ अखेर पर्यंत २८९ गुन्ह्यांनी घट झाली असली तरीही मात्र अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.