सध्या अनेक चित्रपटातून (Oppenheimer) आक्षेपार्ह गोष्टी दाखवल्या जात आहेत. ओम राऊत यांच्या आदिपुरुष चित्रपटातून रामायणाची विडंबना करण्यात आली तर नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) या हॉलिवूड सिनेमामधून हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील असा एक सिन (दृश्य) आहे. त्यामुळे हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
ओपनहाइमर (Oppenheimer) या चित्रपटाची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे भारत सरकारचे माहिती आयुक्त उदय माहूरकर (Uday Mahurkar) यांनी ट्वीट केले आहे.
नेमकं काय म्हणाले उदय माहूरकर?
उदय माहूरकर यांनी ‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) या सिनेमाचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनला पत्र लिहिलं आहे. ट्विट करत त्यांनी याची माहिती दिली आहे. उदय माहूरकर यांनी या पत्रात लिहिलं आहे की,”सेव्ह कल्चर सेव्ह इंडिया फाऊंडेशनकडून नमस्कार. ‘ओपनहाइमर’ या सिनेमात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, असं एक दृश्य आहे. शारीरिक संबंधांदरम्यान भगवद्गीता वाचतानाचं एक दृश्य सिनेमात आहे. ‘भगवद्गीता’ हा हिंदू धर्मातील प्रवित्र ग्रंथांपैकी एक आहे. शारीरिक संबंधांदरम्यान भगवद्गीता वाचणं म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केल्यासारखं आहे”.
उदय माहूरकर पुढे म्हणतात,”आपण कोणत्या जगात जगत आहोत. एजन्सी, मीडिया, राजकारण आणि तुमची हॉलिवूड (Oppenheimer) इंडस्ट्री ही कुराण आणि इस्लामसंदर्भातील कोणत्या गोष्टीचं चित्रण ते दुखावले जातील अशा पद्धतीचं करत नाहीत. मग हिंदू धर्माच्या बाबतीत ही गोष्ट का लागू होत नाही. तुमच्या सिने-निर्मितीचं भारतात खूप कौतुक होत आहे. आमचा विश्वास आहे की, तुम्ही जर सिनेमातील हे वादग्रस्त दृश्य (Oppenheimer) काढून टाकलं तर एक संवेदनशील माणूस म्हणून तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. अब्जावधी हिंदूंच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. याकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर आवश्यक ती कारवाई करावी लागले”.
. @OppenheimerATOM
To,
Mr Christopher Nolan
Director , Oppenheimer filmDate : July 22, 2023
Reg: Film Oppenheimer’s disturbing attack on Hinduism
Dear Mr Christopher Nolan,
Namaste from Save Culture Save India Foundation.
It has come to our notice that the movie…
— Uday Mahurkar (@UdayMahurkar) July 22, 2023
(हेही वाचा – Women’s Safety : महिलांची सुरक्षितता धोक्यात; राज्यात महिलांच्या अपहरणात २२ टक्क्यांनी वाढ)
नेटकऱ्यांचा नाराजीचा सूर
‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) या सिनेमात इंटिमेट सीनदरम्यान भगवद्गीतेचं वाचन होत असल्याचं पाहून नेटकरीदेखील भडकले आहेत. या सीनबद्दल सोशल मीडियावर नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. सिनेमातील हे दृश्य कायम ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवरही नेटकाऱ्यानी (CBFC) टीका केली आहे.
‘ओपेनहायमर’ (Oppenheimer) हा हॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा सिनेमा २१ जुलै २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. भारतात देखील या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community