Jayant Savarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

216
Jayant Savarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिकांमध्ये विविधांगी भूमिका करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे (Jayant Savarkar) ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते (Jayant Savarkar) आजारी होते. काल, (रविवार, २३ जुलै) संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर यांनी ही माहिती दिली.

(हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी कालवश)

मागील चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने त्यांनी (Jayant Savarkar) मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती. जयंत सावरकर (Jayant Savarkar) यांनी शंभरहून अधिक मराठी नाटके केली तर, ३० हून अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते.

त्यांच्या (Jayant Savarkar) मार्गदर्शनामुळे अनेक कलाकार घडले. त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते रंगभूमीवर काम करण्यासाठी सक्रिय होते. त्यांना अनेक कलाकार अण्णा म्हणून हाक मारत. ‘समांतर’ या सुहास शिरवाळकरांच्या कादंबरीवर आधारीत वेब सीरिजमध्ये त्यांनी ज्योतिष्याची भूमिका केली होती. पु.ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारीत त्याच शीर्षकाच्या नाटकात त्यांनी ‘अंतू बर्वा ही भूमिका साकारली होती. ती भूमिका लोकांच्या कायम स्मरणात राहील.

जयंत सावरकर यांच्या अलीकडच्या कामांविषयी बोलायचे झाल्यास ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत ते काम करत होते. तर  काही महिन्यांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतही ते दिसले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.