कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

197
कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत तर काही ठिकाणी दरड कोसळली आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील यंत्रणा सतर्क झाल्या असून मदतीसाठी सहा अग्निशमन केंद्रांबरोबर तीन ठिकाणी रेस्क्यू पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या ७२ जवानांबरोबरच स्थानिक संस्थांचे १५ जवान सज्ज आहेत. त्यांच्या मदतीसाठी तीन रेस्क्यू व्हॅन, १२ बोटी, रूग्णवाहिका, ट्रॅक्टर ट्रॉली, पाणी उपशाचे पंपही ठेवले आहेत.

आपत्तीची माहिती मिळताच सहा केंद्रातील यंत्रणा संबंधित ठिकाणी पोहचणार आहे. तिथे फायर फायटरच्या गाड्या सज्ज असून, तिथे बोटी ठेवल्या आहेत. याशिवाय रेस्क्यू पथकांना देखील घटनास्थळी पाठवण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Ajmer Kand : चित्रपट प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर करू ! – दिग्दर्शक सचिन कदम)

मागील सहा दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ३९.८ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. पंचगंगा नदी आज (२४ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत ३९.९ फुटांवर पोहोचली आहे. नदी इशारा पातळीवर वाहत आहे. धोका पातळी ४३ फुट आहे. पंचगंगा नदी चाळीशीच्या उंबरठ्यावर असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने उभ्या पिकांना पाण्याचा वेढा पडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २४ राज्य मार्ग असून यामधील ९ मार्ग बंद पडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १४ मार्गावरील एसटी सेवा बंद आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.