कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने PF मधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. EPFO च्या प्रस्ताव स्वीकारत वित्त मंत्रालयाने PF वर आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15 टक्के व्याजदर मंजूर केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आता पीएफ खातेदाराला 8.15 टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये 2021-22 साठी EPF वरील व्याज 8.1% या नीचांकी पातळीवर घसरलं होतं.
पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम EPFO (Employees’ Provident Fund Organisation) अनेक ठिकाणी गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. मार्चच्या सुरुवातीला झालेल्या दोन दिवसीय बैठकीत EPFO ने आपल्या सदस्यांसाठी 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती. यानंतर, 2022-23 साठी EPF ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यासाठी तो प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता आणि त्याला मंजुरी देण्यात आली आहे. आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, 2022-23 साठी EPF वरील व्याजदर EPFO च्या पाच कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल.
(हेही वाचा Ajmer Kand : चित्रपट प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर करू ! – दिग्दर्शक सचिन कदम)
कोट्यवधी नोकरदारांना होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) PF वरील व्याजदर वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. CBT ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत. EPF व्याजदरात वाढ झाल्यामुळे सुमारे 6 कोटी सक्रिय ग्राहकांना फायदा होणार असून यापैकी 72.73 लाख नोकरदार हे आर्थिक वर्ष 2022 मध्ये पेन्शनधारक होते.
कर्मचार्यांच्या पगारातून रक्कम केली जाते कपात
एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून 12% रक्कम कपात केली जाते आणि ती रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. कर्मचार्यांच्या पगारातून केलेल्या कपातीपैकी 8.33% रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर 3.67% रक्कम EPF मध्ये जमा केली जाते. दरम्यान, तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून देखील तुम्ही पीएफ रक्कम जाणून घेऊ शकता. सध्याच्या काळात देशभरात सुमारे 6.5 कोटी कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत.
Join Our WhatsApp Community