अलीकडेच यमुनेला आलेल्या पुरामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन उध्वस्त झाले होते. आता कुठे परिस्थिती सामान्य होत आहे. तर दुसरीकडे पुन्हा यमुनेने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे पुन्हा राजधानीवर पुराचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सामान्य जनतेची काळजी वाढली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेते पुरावरुन देखील राजकारण करीत
आहेत.
दिल्लीत पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुनेने पुन्हा एकदा धोक्याचे चिन्ह (२०५.३३ मीटर) ओलांडले आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता नदीची पाणीपातळी २०६.५६ मीटरवर पोहोचली. जुन्या रेल्वे पुलाजवळ यमुनेच्या पाण्याची पातळी १५ तासांत सुमारे एक मीटरने वाढली आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाण्याची पातळी २०५.०९ मीटर होती, ती रविवारी सकाळी १० वाजता २०६.०१ मीटरवर पोहोचली.
(हेही वाचा – मुंबईतील दरडप्रवण क्षेत्रात तातडीने संरक्षक भिंती बांधणार)
१३ जुलै रोजी यमुनेच्या पाण्याची पातळी विक्रमी उंचीवर (२०८.६६ मीटर) पोहोचली होती. त्यामुळे यमुनेचे पुराचे पाणी लाल किल्ला, राजघाट आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. हरियाणात हथिनी कुंडातून पाणी सोडल्यानंतर पाण्याची पातळी वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एलजी व्हीके सक्सेना यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीला सामोरे जाण्याच्या तयारीवर दोघांमध्ये चर्चा झाली. शहा म्हणाले की एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम गरजू लोकांच्या मदतीसाठी उपस्थित आहेत. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community