विधानसभेतील ध्वनिक्षेपक यंत्रणा सदोष; आमदारांच्या भाषणात आवाजाचा अडथळा

161
Assembly Election : हॉटेल ट्रायडेंट आणि नरिमन पॉईंट भागात इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी ?

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा सभागृहात कोट्यवधी रुपये खर्चून बसविलेली ध्वनिक्षेपक यंत्रणा सदोष असल्याची खात्री सोमवार, २४ जुलै रोजी पटली. आवाज व्यवस्थित न येणे, बोलताना मधूनच कानाला त्रास होईल इतका आवाज मोठा होणे यामुळे आमदारांच्या भाषणात अडथळा आणला. दोन्ही बाजूच्या आमदारांनी खाली बसूनच सदोष ध्वनिक्षेपक यंत्रणेबद्दल नाराजी व्यक्त केली.

विधानमंडळाने बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तंत्राची कास धरली आहे. त्यानुसार विधानसभा सभागृहात आमदारांना दिल्या जाणाऱ्या लॅपटॉपची जागा आता ‘हायब्रिड मल्टिमिडीया कॉन्फरन्सिंग’ प्रणालीने घेतली आहे. या प्रणालीमध्ये सभागृहात आमदारांची होणारी भाषणे रेकॉर्डिंग होणार असून सभागृहातील कामकाजाच्या चित्रणाबरोबरच सदस्यांना कामकाजाची रूपरेषा आणि कागदपत्रेही बसल्याजागी एका क्लिकवर पाहता येणार आहेत. तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणाही नवीन बसविण्यात आली आहे.

(हेही वाचा – Devendra Fadanvis : महायुतीचे मुख्यमंत्री शिंदेच राहणार; राष्ट्रवादीच्या अतिउत्साही नेत्यांना फडणवीसांनी सुनावले)

मात्र, आठवडाभरातच ध्वनिक्षेपक यंत्रणेतील दोष समोर आले आहेत. काँग्रेसचे सुभाष धोटे, पी. एन. पाटील, भाजपचे समाधान अवताडे यांना आज सभागृहात बोलताना ध्वनिक्षेपकाच्या आवाजाचा त्रास झाला. आमदार नेमके काय बोलत हे बराच वेळ समजत नव्हते यावर दोन्ही बाजूच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली, खरेतर सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी ध्वनिक्षेपक यंत्रणेची चाचणी घेतली जाते. यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड आहे का, हे तपासले जाते. तरीही आज सभागृहात आपले म्हणणे मांडताना आमदारांना ध्वनिक्षेपकाचा त्रास झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.