Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम परीक्षेतील ४९ टक्के विद्यार्थी दुसऱ्या प्रयत्नातही नापास

154

मुंबई युनिव्हर्सिटीचे बीकॉमचे विद्यार्थी ज्यांनी त्यांच्या पाचव्या सेमिस्टरच्या परिक्षेसाठी दुसऱ्यांदा परीक्षेला बसले होते, ते पुन्हा नापास झाले आहेत. कोविड -१९ च्या साथीच्या काळात विध्यार्थांचे अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाला होता. त्यामुळे त्यांना आता लेखी परीक्षा देत असताना अडचणी येऊ लागल्या आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर या वर्षी एप्रिल-मे महिन्यात बीकॉमच्या अंतिम वर्षाच्या ३६,१०५ विद्यार्थ्यांनी पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी दुसऱ्यांदा नोंदणी केली होती. यापैकी फक्त १६,७८२ म्हणजेच ५१.३६% विद्यार्थी सर्व पेपर्स क्लिअर करण्यात यशस्वी झाले. नियमित पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची कामगिरी फारशी चांगली नसून, त्यापैकी फक्त ३४.२५% अचूकपणे परीक्षा पास झाले.

(हेही वाचा Maharashtra Government : अर्थसंकल्पातील घोषणा हवेत विरली; महात्मा फुले जन आरोग्य योजनेची उपचारमर्यादा ५ लाख झालीच नाही)

“कोविड-१९ साथीनंतर आम्ही परीक्ष पद्धती बदलली आहे आणि विध्यार्थांना सोपे होईल असे प्रश्नपत्रिका सेट केल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडूनही आम्हाला प्रतिसाद मिळत आहे, असे विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.  “कोविड-१९ च्या रोगाच्या काळात कोणतेही प्रत्यक्ष वर्ग घेण्यात आले नव्हते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेपासून संपर्क तुटला होता. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणावरील लक्ष कमी झाले होते, कारण त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्याची जास्त काळजी होती. कोविड-19 चे आफ्टरशॉक अजूनही जाणवत आहेत. त्यामुळे यापुढे परीक्षांचे निकाल सामान्य पातळीवर परत येतील, असे  विद्यापीठाचे अधिकारी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.