मुंबई महापालिकेत सहायक कायदा अधिकारी पदांसाठी भरती, आजपासून ऑनलाईन अर्ज

460
मुंबई महापालिकेत सहायक कायदा अधिकारी पदांसाठी भरती, आजपासून ऑनलाईन अर्ज
मुंबई महापालिकेत सहायक कायदा अधिकारी पदांसाठी भरती, आजपासून ऑनलाईन अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विधि खात्याच्या आस्थापनेवरील सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या सहायक कायदा अधिकारी ३४ आणि सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) १९ या रिक्त पदांसाठी इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन (ONLINE) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवारांनी https://ibpsconline.ibps.in/bmcaeloepr23/ या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी असणे आवश्यक आहे आणि भरती प्रक्रिया परिक्षेची प्रवेशपत्रे आणि इतर माहिती ऑनलाइन (Online) देण्यात येणार असल्याकारणाने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी कार्यान्वीत असणे आवश्यक आहे.

या पदावरील नियुक्ती ही महानगरपालिकेने बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात “महानगरपालिकेच्या वकीलांना न्यायालयामध्ये महानगरपालिकेतर्फे न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी परवानगी देण्याबाबत” दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या अंतिम निर्णयासापेक्ष तात्पुरत्या स्वरुपात राहील. जर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महानगरपालिकेच्या विरुद्ध लागल्यास तो निवड किंवा नियुक्त झालेल्या उमेदवारांवर बंधनकारक राहील व त्यांची सेवा कोणतेही कारण न देता समाप्त करण्यात येईल. याची नोंद अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी असे महापालिका प्रशासनाने जाहिरातीत नमूद केले आहे.

अधिक माहितीसाठी इथे संपर्क साधा..

याबाबतची जाहिरात मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/iri/portal/anonymous/qlmm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवाराने संकेतस्थळ पाहण्यासाठी Internet Explorer versions
(7.0 8.0) Mozilla Firefox 3.0 अथवा Google Chrome 2.0 तथा वरील आवृत्तीचाच वापर करावा. ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत काही अडचणी असल्यास https://cgrs.ibps.in ही लिंक दि. २५.०७.२०२३ पासून उमेदवारांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध होईल.

रिक्त पदांचा तपशील :  

(अ) पदाचे नाव सहायक कायदा अधिकारी..
एकूण रिक्त पदे ३४
वेतनश्रेणी:- ( ४७,६०० – १,५१,१००) अधिक नेहमीचे भत्ते

(ब) सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)
एकूण रिक्त पदे : १९
वेतनश्रेणी:- ( ३८,६०० – १,२२,८००) अधिक नेहमीचे भत्ते

(हेही वाचा – PFI आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘इंडिया’; पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केला हल्लाबोल)

शैक्षणिक अर्हता:

  • उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गाकरीता ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी धारण केलेली असावी.
  • उमेदवार ‘महाराष्ट्र’, ‘महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचा सनदधारक असावा व ४ वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीत वकील म्हणून ‘महाराष्ट्र’ किंवा ‘महाराष्ट्र व गोवा’ बार कौन्सिलकडे नोंद झालेली असावी.
  • उमेदवारास दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे उत्तम ज्ञान व अनुभव आवश्यक.
  • उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी:

२५ जुलै २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत

नेट बँकिंग द्वारे अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी:
२५ जुलै २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत

ऑनलाईन परीक्षेची तारीख :
महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.