कोकण हा निसर्गाने नटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्रीही आमच्या कोकणातील आहेत. मात्र या कोकणात असणाऱ्या विश्रामगृहांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. ती दूर करणार का? असा सवाल भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज चर्चेवेळी उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही सकारात्मक उत्तर दिले.
दरेकर म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील विश्रामगृह चांगली आहेत. तिथले राजकीय नेते मंत्री झाले की आपापल्या विभागाची काळजी घेतात. बांधकाम मंत्री हे कोकणातील आहेत. कोकणातील सर्व विश्राम गृहांची दुरावस्था आहे. ते नेहमी कोकणचा दौरा करतात त्यांना तेथील माहिती आहे. मी पोलादपूरच्या विश्राम गृहांसाठी सातत्याने मागणी केली होती, पत्रव्यवहार केला होता. आंबेनळी घाटातील विश्राम गृहाचे खंडार झाले आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi : देशातील विरोधीपक्ष दिशाहीन – पंतप्रधान नरेंद्र मोदी)
प्रतापगडच्या पायथ्याशी विश्राम गृह आहे. त्याठिकाणी कसलीही व्यवस्था नाही तर ती विश्राम गृह कशासाठी बांधली आहेत. सर्वकष कोकणातील विश्रामगृहांचा आढावा घ्यावा, त्याचे बजेट करावे कारण कोकण पर्यटनासाठी बरेच लोकं येतात. अशावेळेला कोकणातील सर्व विश्रामगृहांची दुरावस्था दूर करणार का? पोलादपूर आणि आंबेनळीच्या विश्रामगृहसंदर्भात घोषणा करावी आणि वडाळा टर्मिनल्स येथे मोठे विश्रामगृह बांधावे. त्याचा ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकप्रतिनिधीना त्याचा फायदा होईल, असा प्रश्न दरेकर यांनी विचारला.
दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, या सर्व गोष्टींचा येणाऱ्या काळात विचार केला जाईल परंतु ५० टक्के विश्राम गृह नादुरुस्त आहेत असे नाही. ज्या ठिकाणी अतिशय नादुरुस्त आहेत त्याठिकाणी नवीन धोरण तयार करून काय करता येईल का? याबाबतचा विचार येणाऱ्या काळात पॉझिटिव्हली ठरवले असून तसे धोरण तयार करण्यात येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community