खडकवासला धरण (Khadakwasla Dam) प्रकल्पात सोमवारी (२४ जुलै) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. मंगळवारी (२५ जुलै) सायंकाळी पाच वाजता धरण ९२ टक्के भरले. अखेर सात वाजता एक दरवाजा उघडून ४२८, रात्री नऊ वाजता ८५६, अकरा वाजता ३४२४ क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दोन दरवाजे उघडण्यात आले होते.
खडकवासला (Khadakwasla Dam) धरणातील पाणीसाठा सोमवारी (२४ जुलै) रात्री ८१ टक्के होता. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कालव्यातून पाणी सोडून धरणाची पातळी कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला. मंगळवारी सकाळी सहा वाजता खडकवासला धरण ८७ टक्के भरले होते. त्यावेळी कालव्यातून ९०५ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. संध्याकाळी पाच वाजता ९२ टक्के धारण भरले होते. त्यावेळी १००५ क्युसेकने विसर्ग सुरू होता. मात्र पाणी वाढत राहिल्याने धरणातून संध्याकाळी सात वाजता विसर्ग ४२८, रात्री नऊ वाजता ८५६ क्युसेकपर्यंत वाढवला.
(हेही वाचा – तानसा धरण आणि विहार तलावही भरले, मुंबई महापालिकेची आता खरी कसोटी)
खडकवासला, (Khadakwasla Dam) पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणक्षेत्रात सलग चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे.
जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी या धरणांची (Khadakwasla Dam) पाहणी केली. सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे ३०, वरसगाव २५, पानशेत २८ व खडकवासला येथे ५ मिलिमीटर पाऊस झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community