मलबार हिल मधील महापालिका जल अभियंता यांच्या अखत्यारीत येणारा क्रमांक १ चा बंगला हा महापालिका अतिरिक्त आयुक्तांना वितरित केला जातो. परंतु मागील काही वर्षापासून या बंगल्यामध्ये पालकमंत्री राहत होते. पण मंत्रीपद गेल्या नंतर हा बंगला त्यांनी रिकामी केल्यावर महापालिकेचे विद्यमान अतिरिक्त आयुक्त (शहर) यांना एक महिन्यांपूर्वीच वितरित करण्यात आला होता. परंतु एक महिन्यानंतर पुन्हा त्यांना हा बंगला रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा बंगला ‘मित्रा’चे प्रवीणसिंह परदेशी यांना देण्याच्या विचार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच या बंगल्यावर काही मंत्र्यांचाही डोळा असल्याने आता हा बंगला परदेशी यांना मिळतो की अन्य कोणी मंत्री या निवासस्थानी हक्क गाजवतो हे आता येणाऱ्या दिवसातच स्पष्ट होईल.
मलबार हिल मधील जल अभियंता यांच्या अखत्यारीत मुळात हा बंगला जल अभियंता यांच्यासाठी होता. पण या बंगल्यावर सनदी अधिकाऱ्यांची नजर पडताच येणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांनी तिथेच राहणे पसंद केले. तेव्हापासून या बंगल्याचा वापर अतिरिक्त आयुक्तांकडून केला जात आहे. आजवर अनेक अतिरिक्त आयुक्तांचे ते सेवा निवासस्थान बनले आहे. विकास खारगे नंतर हा बंगला डॉ. संजय देशमुख यांस देण्यात आला होता पण त्यांनी बंगल्याऐवजी सरकारी सदनिकेत राहण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे २ जानेवारी २०१५ रोजी ४८३० चौरस फूटाचा हा बंगला प्रविण दराडे यांना देण्यात आला होता. यावरून सत्ताधारी शिवसेना त्याच्या पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नसताना त्यांना हा बांधला कशा प्रकारे वितरीत केला याबाबतचा जाबही प्रशासनाचा विचारला होता.
(हेही वाचा – Heavy Rain : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट; रायगड, रत्नागिरीतील सर्व शाळांना सुट्टी)
यानंतर पल्लवी दराडे यांची अतिरिक्त आयुक्त पदी वर्णी लागली आणि यावरील वाद क्षमवण्यात तत्कालीन सरकार यशस्वी ठरले होते. परंतु दरा डे यांनी हा बंगला रिकामी केल्यानंतर राज्यातील महविकास आघाडी सरकारच्या काळात शहराचे तत्कालिन पालकमंत्री अस्लम शेख यांनी हा बंगला शासकीय बंगला म्हणून वापरला होता. पण त्यांचे मंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी हा बंगला पुन्हा रिकामी करून दिला. मागील महिन्यात महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे जल अभियंता यांचा एक क्रमांकाचा हा रिकामी बंगला त्यांना वितरित करण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी आपले सामान या नवीन जागेत हलवले. परंतु एक महिन्यातच हा बंगला रिकामी करून देण्याचे आणि दोन नंबरच्या बंगल्यामध्ये सामान स्थलांतरित होण्याच्या सूचना करण्यात आले आहेत.
परंतु हर्डीकर यांनी पंधरा दिवसांची मुदत मागितल्यामुळे सध्या त्यांचे सेवानिवासस्थान दोन क्रमांकाच्या बंगल्यामध्ये स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हर्डीकर यांना काढून एक क्रमांकच्या बंगल्यामध्ये नक्की कोणाला निवासस्थान म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हे सेवानिवासस्थान प्रवीण सिंह परदेशी यांच्यासाठी खाली करून देण्याच्या प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एका बाजूला परदेशी यांच्यासाठी हा बंगला रिकामी करण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे या बंगल्याची पाहणी करण्यासाठी काही मंत्र्यांचे प्रतिनिधी येत आहेत. त्यामुळे नक्की हा बंगला परदेशी यांना मिळणार की कोणा मंत्र्याला मिळणार याबाबतच्या प्रश्न अनुत्तरितच आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community