Veer Savarkar : वीर सावरकर भवनासाठी केले घर दान; जालनातील एस. एन कुलकर्णी यांची घोषणा

479

महाराष्ट्रातील जालना येथे राहणारे निवृत्त अधिकारी एस. एन. कुलकर्णी यांनी त्यांच्या वीर सावरकर यांच्यावरील प्रेमापोटी मोठा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर भवनासाठी त्यांनी आपले घर दान करण्याची घोषणा केली आहे.  कुलकर्णी हे शहरातील उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या भाग्यनगरमध्ये राहतात.

वीर सावरकरांचा त्याग, संघर्ष, इंग्रजांविरुद्ध जागतिक युद्ध पुकारण्याचे अदम्य धैर्य आणि राष्ट्राप्रतीचे खरे समर्पण यामुळे जालन्यातील निवृत्त अधिकारी एस. एन. कुलकर्णी यांना आयुष्यातील मोठा निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली. सेवानिवृत्तीनंतरचे लोक आपली संपत्ती साठवून पुढच्या आयुष्याची चिंता करत असताना, एस. एन. कुलकर्णी यांनी वीर सावरकर भवनाच्या बांधकामासाठी आपले निवासस्थान दान करण्याची घोषणा केली आहे.

(हेही वाचा : Coal Scam : काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)

वीर सावरकर भवन कसे असेल?

वीर सावरकर भवनाच्या संकल्पनेसंबंधी एस. एन. कुलकर्णी म्हणाले की, डिसेंबर 2023 पर्यंत यासंबंधीची कागदपत्रे पूर्ण केली जातील. त्यानंतर वीर सावरकर भवनाचे बांधकाम सुरू होईल. यात एक मोठा हॉल आणि दुमजली महिला वसतिगृह असेल. वीर सावरकर भवन या नवीन इमारतीचे बांधकाम 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. सावरकर भवनाचे संचालन एस. एन. कुलकर्णी व त्यांचे सहकारी करणार आहेत.

वीर सावरकरांवर निष्ठा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथांचे अनेक खंड वाचल्याचे एस. एन. कुलकर्णी सांगतात. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे जीवन लोकांसमोर यावे व विद्यार्थिनींनी चांगल्या ठिकाणी राहून शिक्षण घ्यावे, या उद्देशाने त्यांनी आपले घर वीर सावरकर भवनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एस. एन. कुलकर्णी यांच्या कुटुंबात दोन मुले आणि एक मुलगी आहे, त्यांचा भाग्यनगर बंगला सुमारे 2800 स्क्वेअर फूट जागेत आहे, जो त्यांनी दान करण्याची घोषणा केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.