Harmanpreet Kaur : भारताची कर्णधार हरमनप्रीतवर दोन सामन्यांची बंदी

167
Harmanpreet Kaur : भारताची कर्णधार हरमनप्रीतवर दोन सामन्यांची बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने महिला क्रिकेट संघाची कर्णधार (Harmanpreet Kaur) हरमनप्रीत कौरला पुढील दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान केलेल्या गैरवर्तणुकीमुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे हरमनप्रीत कौरला सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांत खेळता येणार नाही.

(हेही वाचा – IND vs PAK : नियोजित दिवसाच्या एक दिवस आधीच होणार सामना?)

नेमकं प्रकरण काय?

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर भारतीय कर्णधार (Harmanpreet Kaur) हरमनप्रीत कौरने स्टंपला बॅट मारली. पंचांच्या निर्णयाने ती निराश दिसली आणि पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मैदानावरील पंचांना रागाने काहीतरी बोलतानाही दिसली. ट्रॉफी फोटोशूटमध्ये तिने खेळाडूंसोबत पंच असायला हवेत असेही म्हटले होते. सामना संपल्यानंतरही ती संताप व्यक्त करत म्हणाली, ‘अंपायरिंग खूपच खराब होते, आंतरराष्ट्रीय स्तरावर असे निर्णय खूप निराशाजनक दिसतात.’ हरमन ३४व्या ओव्हरमध्ये आऊट झाली आणि २२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला केवळ २२५ धावा करता आल्या. त्यामुळे तिसरा एकदिवसीय सामना बरोबरीत संपला आणि ३ एकदिवसीय मालिका १-१ ने बरोबरीत संपली. सामन्याचे पंच मुहम्मद कमरुझमान आणि तनवीर अहमद होते. दोन्ही पंच बांगलादेशचे होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.