सतरा वर्षांपूर्वी या तारखेला मुंबईमध्ये खूप मुसळदार पाऊस झाला होती, ज्यामुळे संपूर्ण शहरात हाहाकार माजला होता, अनेकांचा बळी गेला होता आणि अनेक लोक पाऊसात अडकले होते
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. आणि जर तुम्ही पावसाळ्यात गुडग्याभार पाण्यात खाल्ला नाहीत, तर तुम्ही मुंबई खरी पहिलीच नाही आहे. कधी न थांबणाऱ्या मुंबईला, २६ जुलै २००५ पुराने जागेच थांबवले, आणि मुंबईकर ही घटना कधीच विसरू नाही शकत.
बरेच लोक रस्ते आणि रेल्वे स्थानकांवर अडकून पडले होते, तर बरेच लोक त्या संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतले न्हवते. आतापर्यंतच्या सर्वात जास्त पाऊस २००५ मध्ये झाला होता, ज्यामुळे मुंबईमध्ये पूर आला होता. २६ जुलै २००५ रोजी, २४ तासांच्या कालावधीत 944 मिमी पाऊस पडला, ज्याचा भारताच्या आर्थिक राजधानीवर मोठा फटका बसला.
(हेही वाचा Harmanpreet Kaur : भारताची कर्णधार हरमनप्रीतवर दोन सामन्यांची बंदी)
- अनेकांना जीव गमवावा लागला आणि अनेक घरेही उद्ध्वस्त झाली. पुरामुळे ३७,००० ऑटो रिक्षा, ४,००० टॅक्सी, ९०० बेस्ट बसेसचे नुकसान झाले, तर १०,००० ट्रक आणि टेम्पो जमीनदोस्त झाले.
- रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्याही ठप्प झाल्या. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
- परंतु पूर मुंबईकरांच्या आत्म्याला पराभूत करू शकला नाही, ज्यांनी आपल्या सहकारी नागरिकांना केवळ मदत केली नाही, तर अडकलेल्या भटक्या प्राण्यांची ह्या भयंकर पावसात सुटकाही केली.