दुबई येथून भारतात हद्दपार करण्यात आलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या साथीदाराला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने अटक केली आहे. विक्रमजीत सिंग उर्फ विक्रम ब्रार असे अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिष्णोईच्या साथीदाराचे नाव आहे. विक्रम ब्रार हा ११ गंभीर गुन्ह्यात फरार आरोपी असून गायक मुसेवाला हत्या प्रकणात त्याचा सहभाग होता अशी माहिती एनआयएने दिली आहे.
प्रसिद्ध पंजाबी गायक शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मूसेवाला हत्याकांडात सहभागी असलेल्या विक्रम ब्रारला एनआयएच्या एका पथकाने दुबईत दाखल होत त्याला ताब्यात घेतले. मंगळवारी विक्रम ब्रारला भारतात आणले आहे. लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार टोळीतील गुंडाच्या मदतीने विक्रम ब्रार हा भारतात शस्त्रांची तस्करी आणि खंडणीसाठी व्यवसायिकांना लक्ष करीत होता. २०२० पासून फरार असलेला विक्रम ब्रारच्या विरोधात शस्त्रास्त्र कायदा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी सारख्या ११ गुन्ह्यांमध्ये तो सामिल होता. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीसह विविध राज्यातील पोलिसांनी लुक आउट नोटिस जारी केल्या होत्या.
(हेही वाचा – Sandeep Deshpande : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसे नेते संदीप देशपांडेंनी उडवली खिल्ली)
विक्रम ब्रार दुबईमधून लॉरेन्स बिश्नोई दहशतवादी टोळीसाठी ‘कम्युनिकेशन कंट्रोल रूम’ (सीसीआर) म्हणून काम करत होता. हा सीसीआर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार (कॅनडा स्थित) यांच्या कॉल्सची सोय करत होता आणि त्यांच्या निर्देशानुसार तो विविध लोकांना खंडणीसाठी कॉल करत होता अशी माहिती एनआयएने दिली आहे. एनआयएच्या तपासानुसार, विक्रमजीत सिंग उर्फ विक्रम ब्रारने मूसेवालाच्या हत्येसाठी गोल्डी ब्रारला मदत केली होती. लॉरेन्स बिश्नोईने हवालामार्फत अनेक वेळा विक्रम ब्रारला अनेकवेळा खंडणीचे पैसे पाठवले होते. विक्रम ब्रार याने नुकतीच कुरुक्षेत्र (हरियाणा) येथील एका डॉक्टरकडे खंडणीची मागणी केली होती आणि त्याला धमकावले होते, अशी माहिती एनआयएने दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community