Milk : तुम्हाला माहितीय का? दुधाचा रंग काळा आणि गुलाबी देखील असतो? वाचा ही बातमी

207

जगात अनेक चित्रविचित्र गोष्टी घडत असतात. त्यापैकीच एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही गोष्ट आहे दुधाच्या रंगाची. आपण सगळेच घरात दुधाचा वापर करतो. दूध पौष्टिक असते. अगदी नवजात बाळालाही दूध पाजण्याचा सल्ला दिला जातो. पण या दुधाविषयी आपल्याला किती माहिती आहे? दुधाचा रंग पांढरा असतो हे आपल्याला माहितीच आहे किंवा कधीतरी ते फिकट पिवळसरही असते. साधारणपणे पृथ्वीवर बहुतेक प्राण्यांचे दूध पांढऱ्या रंगाचे असते कारण त्या दुधात कॅसिनचे प्रमाण जास्त असते. पण तुम्हाला माहिती आहे का, की दुधाचे रंग वेगवेगळे असू शकतात.

भारतात सगळ्या गाईंचे दूध हलक्या पिवळ्या रंगाचे असते कारण त्यांच्या दुधात कॅसिनचे प्रमाण कमी असते. पण पांढऱ्या रंगाव्यतिरिक्त दुधाचे आणखीही रंग या जगात पाहायला मिळतात. होय तुम्ही बरोबरच वाचलेत. या जगात पांढऱ्या रंगाच्या दुधाव्यतिरिक्त गुलाबी आणि काळ्या रंगाचे दूधही पाहायला मिळते. ते दूध कोणत्या प्राण्यांचे असते ते पाहुयात..

(हेही वाचा Sandeep Deshpande : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसे नेते संदीप देशपांडेंनी उडवली खिल्ली)

तिबेटच्या पठारी भागात असणाऱ्या याक नावाच्या प्राण्यांचे दूध हे गुलाबी रंगाचे असते. तसेच ते इतर दुधापेक्षा थोडे घट्ट सुद्धा असते. चीन आणि मंगोलिया सारख्या प्रदेशामध्ये याकच्या दुधाचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. जगातील 95% याक हे तिबेटमध्ये पाहायला मिळतात.

आफ्रिकेत पाहायला मिळणाऱ्या गेंड्याच्या मादीचे दूध हे काळ्या रंगाचे असते. या दुधामध्ये वसाचे प्रमाण 0.2% इतके असते. या प्राण्यांना करा गेंडा असेही म्हटले जाते. काळ्या गेंड्याची मादी आपल्या पिलांना बरीच वर्षे स्तनपान करते.

याव्यतिरिक्त या पृथ्वीतलावर असाही एक कीटक आहे जो दूध देतो आणि त्याच्या दुधामध्ये प्रोटिन भरपूर प्रमाणात मिळते. होय! त्या किटकाचे नाव आहे झुरळ. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले असेल पण झुरळाच्या मादीच्या दुधामध्ये एक पेसिफिक बिटल असते. या बिटलचा उपयोग प्रोटीनसारखा केला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.