मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी मुंबई पोलीस दलात ३ हजार ‘महाराष्ट्र सुरक्षा दलाचे’ जवान दाखल होणार आहे. राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रदान करण्यात येणारे मनुष्यबळ हे ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने मुंबई पोलीस दलात काम करणार आहे.
मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची ४० हजार ६२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई पदाची सुमारे दहा हजार पदे रिक्त आहे. मुंबई पोलिसांना कमी मनुष्यबळ दैनंदिनी कामे आणि इतर कर्तव्यांसाठी अपुरे पडत आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलिस भरती मधून मुंबई पोलीस दलाला सात हजार पोलीस शिपाई नव्याने मिळणार आहे. त्यानंतर देखील मुंबई पोलीस दलात ३ हजार पोलीस शिपाई पदे रिक्त रहात आहे. भरती प्रक्रिया व प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी २ वर्षांनंतर आयुक्तालयास मनुष्यबळ उपलब्ध होणार आहेत.
(हेही वाचा – Jail : आरोपींना आजही ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची अन्यथा तुरुंगात ‘नो एन्ट्री’)
पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान ११ महिने कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ३ हजार मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहविभागाकडे केली होती. राज्य शासनाकडून मागणीला मान्यता देत राज्य सुरक्षा महामंडळाने मुंबई पोलीसाना ३ हजार मनुष्यबळ पुरविण्याबाबत गृहविभागा कडून कळविण्यात आले आहे. राज्य सुरक्षा महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ३ हजार जवान मुंबई पोलीस दलाच्या मदतीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community