मुंबई ‘सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा’

असा आराखडा असणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार

162
मुंबई 'सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा'
मुंबई 'सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा'

आपत्ती ही पूर्वसूचना देऊन येत नाहीत. त्यामुळे या आपत्तींसाठी आपण सदैव सजग व सतर्क असणे गरजेचे आहे. याच उद्देशाने केंद्र सरकारच्या सुचनेनुसार व संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील ‘युनिसेफ’च्या सहकार्याने मुंबई ‘सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. त्यात सर्व संभाव्य आपत्ती आणि सर्व संबंधित यंत्रणांचा समावेश केला आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार होणारा हा आराखडा असणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या परळ परिसरात असणाऱ्या शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या सभागृहात बुधवारी २६ जुलै २०२३ आयोजित एका विशेष कार्यशाळेदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘भूकंप’ या आपत्तीच्या अनुषंगाने आयोजित या ‘टेबल टॉप एक्सरसाइज’ कार्यशाळेला महानगरपालिकेचे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, संयुक्त राष्ट्र संघाच्या युनिसेफचे प्रतिनिधी युसुफ कबीर आणि चिन्मयी हेमानी, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) रश्मी लोखंडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबई कार्यरत केंद्र व राज्य शासनाच्या विविध संस्था, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही या कार्यशाळेला उपस्थित होते.

New Project 2023 07 26T202954.064

(हेही वाचा – महाराष्ट्रातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत मिळणार १८६६.४० कोटी रुपये)

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये पूर्वतयारी व नियोजन या बाबींची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विविध संस्थांमध्ये सुसमन्वय साधला जाणे, ही बाब अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी कार्यशाळांचे नियमितपणे व सुयोग्य प्रकारे आयोजन करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना सहआयुक्त मिलिन सावंत यांनी मुंबईत विविध संस्थांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.

संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. आपत्कालीन व्यवस्थापनातील विविध बाबींचे महत्त्व, संबंधित नियोजन व अंमलबजावणी याची उदाहरणांसहित त्यांनी सविस्तर मांडणी केली. महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेला विविध संस्थांचे सुमारे १२५ प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्याचा भाग असणाऱ्या १४ ‘आणीबाणी मदत कार्य’ अर्थात ‘इमर्जन्सी सपोर्ट फंक्शन्स’ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समन्वयकांची देखील कार्यशाळेला उपस्थित होती. या सर्व १४ घटकांचे प्राथमिक आराखडे कार्यशाळेदरम्यान निर्धारित करण्यात आले, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.