कामावर असताना मोबाईल वापरणे सोफी अल्कॉक या महिलेला चांगलेच महागात पडलं आहे. ब्रिटनमधील मँचेस्टर रेस्टॉरंटमध्ये मोबाईल वापरण्याबाबतच्या नियमांचा भंग केल्यामुळे सोफीला कामावरुन काढून टाकण्यात आलं. सोफी अल्कॉकच्या म्हणण्यानुसार, शिफ्ट सुरू होण्यापूर्वी ती तिच्या मोबाईचा वापर करत होती.
मोबाईल वापरल्यानं महिलेला नोकरीवरून हटवलं
मीडिया रिपोर्टनुसार, सोफी अल्कॉक ही ब्रिटनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. कामादरम्यान फोन वापरताना आढळून आल्याने सोफी अल्कॉकला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. न्यूयॉर्क पोस्टनुसार, ड्युटीवर मोबाईल वापरल्यामुळे सोफीला मँचेस्टर रेस्टॉरंटमधली नोकरी गमवावी लागली. बॉसने सोफीला कशाप्रकारे कामावरून काढून टाकलं गेलं याचा व्हिडीओही बनवला होता.
(हेही वाचा Jail : आरोपींना आजही ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची अन्यथा तुरुंगात ‘नो एन्ट्री’)
Join Our WhatsApp Community