आज (गुरुवार २७ जुलै) मुंबई शहराला (Heavy Rain) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. कालपासून (२६ जुलै) मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. अशातच संपूर्ण राज्यात देखील गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि चंद्रपूर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Flu : जोरदार पावसानंतर भारतात आली डोळ्याच्या फ्लूची लाट)
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (Heavy Rain) मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. रायगड जिल्ह्याला उद्याही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
IMD issues ‘red alert’ for Mumbai, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts today: IMD Mumbai issues forecast at 8:00 PM IST pic.twitter.com/imxkk2ezEf
— ANI (@ANI) July 26, 2023
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मोसमी (Heavy Rain) पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community