पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (गुरुवार २७ जुलै) गुजरातमधील राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी राजकोटच्या ग्रीनफिल्ड विमानतळाचं आज उद्घाटन करणार आहेत. “हे विमानतळ खूप मोठं आणि सुंदर आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे की, पंतप्रधान मोदी (Narendra Modi) या विमानतळाचं उद्घाटन करतील आणि यावेळी ते गुजरातच्या लोकांना समर्पित करतील.”
(हेही वाचा – Heavy Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी)
पंतप्रधान (Narendra Modi) कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजकोट येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासामुळे देशभरातील हवाई संपर्क सुधारण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला चालना मिळेल. ग्रीनफिल्ड विमानतळ २५०० एकर पेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि १४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलं गेलं आहे. नव्या विमानतळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि टिकाऊ सुविधा आहेत.
टर्मिनल बिल्डिंग इंटीग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट (GRIHA-4) साठी ग्रीन रेटिंग आहे आणि नवी टर्मिनल बिल्डिंग (NITB) डबल इन्सुलेटेड रूफिंग सिस्टम, स्कायलाइट्स, एलईडी लायटिंग, लो हीट गेन ग्लेजिंग यासारख्या विविध टिकाऊ वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community