गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाचा (Heavy Rain) जोर वाढला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाकडून आज गुरुवार २७ जुलै रोजी (Heavy Rain) मुंबईसह, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
वीज पडून सहा जणांचा मृत्यू
दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) वीज पडून पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेतातून परत येणाऱ्या गीता ढोंगे (४५ वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला. तर सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे शेतात काम करणाऱ्या कल्पना झोडे आणि अंजना पूसतोडे या दोन महिलांचा मृत्यू झाला. तसेच कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील पुरुषोत्तम परचाके (२५ वर्षे) या शेतकऱ्याचा फवारणी करताना वीज पडून मृत्यू झाला. तर दुसरीकडे गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनविभागाच्या कामावर वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजूर गोविंदा टेकाम याचाही वीज पडून मृत्यू झाला. शिवाय पोंभूरणा तालुक्यात देखील अर्चना मडावी महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
(हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधान मोदी करणार राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन)
चंद्रपूर आणि गडचिरोलीला ‘रेड अलर्ट’
चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्याला आज (२७ जुलै) पावसाचा (Heavy Rain) रेड अलर्ट देण्यात आला तर नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूर वेधशाळेने हा अलर्ट दिला आहे.
चंद्रपूरमध्ये आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई ठाणे आणि रत्नागिरी प्रमाणेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश दिला आहे. सततच्या (Heavy Rain) मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community