चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संस्था ३० जुलै रोजी सहा सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 ही मोहीम प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने ही मोहीम पार पाडली जाईल.
३० जुलै रोजी होणार PSLV-C56 चे प्रक्षेपण
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर इस्रो ३० जुलै रोजी सकाळी ०६.३० वाजता PSLV-C56 सह सहा सहप्रवासी उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे.
(हेही वाचा – Prahlad Singh Patel : केंद्रीय मंत्र्यांना सेक्सटोर्शन फोन करण्याऱ्या दोघांना अटक)
सर्व हवामानात काम करण्यास अनुकूल
DS-SAR मध्ये इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजद्वारे विकसित सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) पेलोड आहे. हे DS-SAR ला सर्व हवामान परिस्थितीत दिवस आणि रात्रची माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community