आज (गुरुवार २७ जुलै) मुंबई शहराला (Heavy Rain) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या रेडअलर्टमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. हवामान विभागाने आता उद्या शुक्रवारी (२८ जुलै) दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईसाठी पुन्हा रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईकरांसाठी हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. कालपासून (२६ जुलै) मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरु आहे.
अशातच संपूर्ण राज्यात देखील गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि चंद्रपूर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Heavy Rain : चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू)
गरज असेल तरच घराबाहेर पडा
मुंबईसाठी (Heavy Rain) पुढील १२ तास अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (Heavy Rain) मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, गडचिरोली या जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सततच्या मुसळधार (Heavy Rain) पावसामुळे विविध जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या तब्बल १३ टीम यांना पाचारण करण्यात आले आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात होत असलेल्या तुफान पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मोसमी (Heavy Rain) पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
Join Our WhatsApp Community