राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या कारभाराचे १२ वाजले आहेत. कारण सध्या हजारो विद्यार्थी ज्यांना परदेशात पद्व्युत्तर शिक्षणासाठी जायचे आहे, दुर्दैवाने त्यांना Migration Certificate मिळत नाही. या एका समस्येमुळे हजारो विद्यार्थ्यांचे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. कारण हे Migration Certificate ऑनलाईन पद्धतीने मिळत आहे आणि सरकारची साईट बंद आहे.
@narendramodi @Dev_Fadnavis @ChDadaPatil @AjitPawarSpeaks @mieknathshinde
Dear leaders, pursuing quality education has been important for everyone, and not everyone is lucky enough to be accepted into universities of their preference.I got into university of Southampton.
— Rajas (@NotRj1709) July 27, 2023
नवी मुंबईतील MGM CET महाविद्यालयांतून राजस जोगळेकर हे पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयात ते दुसरे आले आहेत. त्यांनी या क्षेत्रात पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठी UK येथे प्रवेश घेतला आहे. सुदैवाने त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्यासाठी त्यांना तिथे राहण्यासाठी खोली मिळाली आहे. त्याची आगाऊ रक्कमही त्यांनी भरली आहे. आता त्यांना ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत याची गुणपत्रिका मिळणे गरजेचे बनले आहे. परंतु मुंबई विद्यापीठाचा संथ कारभार यामुळे ही गुणपत्रिका ताबडतोब मिळणे अशक्य आहे. त्यामुळे MGM CET महाविद्यालयाकडून किमान ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, असा उल्लेख असलेले बोनाफाइड सर्टिफिकेट आणि UK विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता आहे.
सरकारी कारभारामुळे कोंडी
UK येथील महाविद्यालयाने राजस यांच्याकडे बोनाफाइड सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेटची मागणी केल्यामुळे त्यांनी महाविद्यालयांत धाव घेतली, मात्र महाविद्यालयाने मायग्रेशन सर्टिफिकेट ऑनलाईनच मिळते, असे सांगितले. राजस यासाठी राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात गेले मात्र तिथेही त्यांना ऑनलाईनच अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार राजस जोगळेकर हे मागील आठवडाभरापासून aaplesarkar.com वर अर्ज करत आहेत. सर्व माहिती भरल्यानंतरही साईट पुढे काम करत नाही. राजस साईटवर दिलेल्या helpline नंबरवर संपर्क करत आहेत, मात्र तो नंबरही बंद आहे. राजस यांनी संबंधीत विभागाला मेल केला, मात्र त्यावरूनही अपेक्षित उत्तर मिळत नाही. यामुळे राजस यांची आता सरकारी कारभारामुळे कोंडी झाली आहे.
(हेही वाचा Heavy Rain : मुंबईत रेड अलर्ट; शाळा-महाविद्यालयांना सुटी)
विद्यार्थ्यांमध्ये निराशा
विशेष म्हणजे ज्या UK येथील महाविद्यालयात राजस यांनी प्रवेश घेणे ठरवले आहे, त्याची अंतिम मुदत ३० जुलै आहे. आता त्यांच्याकडे अवघे ३ दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत राजस यांचा मायग्रेशन सर्टिफिकेटसाठीचा संघर्ष सुरूच आहे. सध्या राजस हे एकच नाहीत, असे हजारो विद्यार्थी आहेत, जे मायग्रेशन सर्टिफिकेट मिळण्यासाठी धडपड करत आहेत, परंतु सरकारच्या अनास्थेमुळे त्यांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने याकडे त्वरित लक्ष देऊन आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राजस जोगळेकर करत आहेत.
Join Our WhatsApp Community