अनियमित आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल वजन वाढणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात. पण तरीही फायदा होत नाही. रोजच्या जीवनात अनियमित सवयींमुळे वाढणाऱ्या अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत.
१. अपुरी झोप
अपुरी झोप घेणे हे देखील वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे. अपूऱ्या झोपेमुळे भूक कमी करणारे हार्मोन लेप्टिन वाढल्यामुळे व्यक्तिला वारंवार भूक लागते. या समस्येला सामोरे जाण्यासाठी वेळेवर झोप घेणे फार महत्वाचे आहे.यासाठी झोपेच्या वेळेच्या दोन तास आधी जेवण करावे.
(हेही वाचा Heavy Rain : पावसाचा वेग वाढला; वाहतूक मंदावली)
२. नाश्ता वगळा
ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी अनेकजण सकाळची न्याहारी करत नाहीत. न्याहारी न केल्याने चयापचय क्रिया मंदावते. अशातच दिवसभर उत्साही राहण्यासाठी नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे. सकस न्याहारीमुळे दिवस निरोगी आणि उत्साही राहतो आणि पोटही भरलेले राहते.
३. टेन्शन
जर आवश्यकतेपेक्षा जास्त ताण वाढला तर तो आपल्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी देखील वाढवतो. अभ्यासानुसार, कोर्टिसोलची उच्च पातळी आणि चरबीचे वस्तुमान यांच्यात मजबूत संबंध आहे. कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन अनेक समस्या निर्माण करतो तसेच वजन वाढवण्याचे कामही करतो.
Join Our WhatsApp Community