इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या डॉ. अदनानली सरकार याला पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक करण्यात आली आहे. एनआयए या तपास संस्थेने काही आठवड्यांपूर्वी मुंबई ठाणे आणि पुण्यातून इसिस मॉड्युल प्रकरणात चार जणांना अटक केली होती. कोंढवा येथून करण्यात आलेली या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. एनआयएने डॉ. सरकार यांच्या कोंढवा येथील घराची झडती घेतली असता झडती दरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक दस्तऐवज तसेच गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून इसिस या संघटनेसोबत असलेला डॉक्टर सरकार याचे संबंध आणि निष्ठा समोर आले असून डॉ. सरकार हा असुरक्षित तरुणांना प्रेरित करून आणि त्यांना इसिसमध्ये भरती करून इसिस या संघटनेच्या हिंसक कार्यक्रमाला चालना देण्याची त्याची भूमिका उघडकिस आली आहे. एनआयएच्या तपासानुसार, डॉ. सरकार हा देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा प्रयत्न करत होता आणि आयएसआयएसच्या कटाचा भाग म्हणून भारत सरकारच्या विरोधात युद्ध पुकारत होता असे एनआयएच्या तपासात समोर आले.
(हेही वाचा – Heavy Rain : पावसाचा वेग वाढला; वाहतूक मंदावली)
डॉ. सरकारच्या अटकेनंतर या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. २८ जून रोजी एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्यात ३ जुलै रोजी एनआयएने यापूर्वी चार जणांना मुंबई ठाणे आणि पुणे येथून अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community