Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाला सलग चार दिवस सुट्टी

190
Monsoon Session : उत्तरावर बोलू न दिल्यानं महाविकास आघाडीचा सभात्याग

राज्यभरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लवकर गुंडाळले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, हे अधिवेशन वेळापत्रकानुसार ४ ऑगस्टपर्यंत चालणार असून, शनिवार २९ जुलै ते १ ऑगस्ट असे चार दिवस कामकाज होणार नसल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सभागृहात दिली.

गुरुवारी २७ जुलै रोजी विधानभवनामध्ये विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज वेळापत्रकानुसार ४ ऑगस्टपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी २९ जुलै ते १ ऑगस्ट असे चार दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा विरोधकांच्या I.N.D.I.A आघाडीवर हल्लाबोल; भ्रष्टाचारी छोडो I.N.D.I.A, परिवार वाद छोडो I.N.D.I.A)

२९ जुलै आणि ३० जुलै रोजी शनिवार-रविवार असल्यामुळे शासकीय सुट्टी. सोमवार, ३१ जुलै रोजी सभागृहाची बैठक होणार नाही. मंगळवार, दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा असल्याने सभागृहाची बैठक होणार नाही, अशी माहिती देण्यात आली.

अंतिम आठवडा प्रस्ताव कधी?

बुधवार २ ऑगस्ट रोजी शासकीय कामकाज होईल. गुरुवार ३ ऑगस्ट विरोधी पक्षाचा प्रस्ताव (अंतिम आठवडा प्रस्ताव) होईल. शुक्रवार ४ ऑगस्ट शासकीय कामकाज आणि अशासकीय कामकाज (ठराव) घेऊन अधिवेशनाची समाप्ती होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.