हेल्दी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी तसेच आपल्या चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. अशा अनेक भाज्या आहेत ज्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे, त्याचबरोबर या भाज्यांचा वापर आपण त्वचेला सुंदर बनवण्यासाठीही करु शकतो. आज आपण भाज्यांपासून बनवलेल्या काही फेस पॅकबद्दल सांगणार आहोत. भाज्यांपासून बनवलेल्या फेस पॅकचा फायदा त्वचेच्या मृत पेशी काढून चेहऱ्याची चमक उजळवण्यासाठी केला जातो. नैसर्गिकरित्या बनवलेल्या या फेस पॅकमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि चांगला परिणाम देतात.
१. बटाटा फेस पॅक
त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरतो. कच्चा बटाटा तुमच्या त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर करू शकतो. बटाट्याचा रस अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मिसळून तुम्ही फेस पॅक बनवू शकता. बटाटा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात १ चमचा बटाट्याचा रस किंवा बटाट्याचा लगदा, १ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा मध, हे सर्व साहित्य एकजिव करून घट्ट पेस्ट बनवा. हा उपाय केल्याने काही दिवसातच तुमची त्वचा चमकू लागेल.
२. काकडीचा फेस पॅक
उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा कोमेजली जाऊ शकते. डोळ्यांखालची काळी वर्तुळे दुर करण्यासाठी काकडीचा वापर करु शकता. काकडी सोलून बारीक किसून घ्या. कोरफडीच्या पानातून जेल काढा आणि ते काकडीत चांगले मिसळा आणि चेहऱ्याला लावा. हा पॅक १५ ते २० मिनिटे तसाच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईतल्या पावसाने मोडला जुलै महिन्याचा रेकॉर्ड; 5 दिवसात 1000 मिमी पाऊस)
३. टोमॅटोचा फेस पॅक
टोमॅटो हा एक उत्तम फेशियल मास्क आहे. तो त्वचेला चिरतरुण ठेवण्यास मदत करतो. टोमॅटो प्रत्येक प्रकारच्या त्वचेला शोभतो. टोमॅटोचा फेस पॅक बनवण्यासाठी टोमॅटो घ्या आणि त्याचा रस काढा. आता त्यात १ चमचा बेसन, १ चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि दूध घाला. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर लावा आणि कोरडी होईपर्यंत तशीच ठेवा. नंतर चेहऱ्याला पाण्याने चांगले धुवा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community