मुंबई महापालिकेच्या मलबार हिल मधील जल अभियंता विभागाच्या ताब्यातील बंगला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा मंत्र्याला देण्यास आता विरोध होत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आलेला बंगला रिकामी करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु हर्डीकर यांना हा बंगला खाली करायला लावून ‘मित्रा’चे प्रविणसिंह परदेशी यांना देण्याचा प्रयत्न सुरु असल्याने हा बंगला केवळ अतिरिक्त पदावरील अधिकाऱ्यालाच देण्यात यावा अशी मागणीच केली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या मलबार हिलमधील मोठा बंगल्याचा वापर अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू हे करत असून अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे निवृत्त झाल्याने त्यांनी रिकामी केलेला या बंगल्यात एक महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सेवा निवासस्थान देण्यात आले होते. परंतु हर्डीकर यांना देण्यात आलेला बंगला आता त्यांना रिकामी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईतल्या पावसाने मोडला जुलै महिन्याचा रेकॉर्ड; 5 दिवसात 1000 मिमी पाऊस)
हर्डीकर राहत असलेला बंगला मित्राचे प्रविण सिंह परदेशी यांना देण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्यामुळे हर्डीकर यांना हा बंगला रिकामी करण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. शेजारील मोठ्या बंगल्यात सध्या अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू राहत आहेत. त्यामुळे त्यांची बदली झाल्यानंतर हा बंगला रिकामी होणार आहे. पण याच्या शेजारील बंगला हा हर्डीकर यांना दिलेला असताना तो काढून घेण्याचा प्रयत्न होणे हे अनेकांना न पटणारेच असे आहे.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मलबार हिलमधील बंगला हा मुळात जलअभियंता यांच्यासाठी आहे. परंतु त्यानंतर याचा वापर अतिरिक्त आयुक्तांच्या सेवा निवासस्थानासाठी केला जात आहे. असे असताना तो अतिरिक्त आयुक्तांसाठीच राहावा, असे त्यांनी स्पष्ट केले. या अतिरिक्त आयुक्तांच्या सेवा निवासस्थानामध्ये अन्य शासकीय अधिकाऱ्यांना तसेच मंत्र्यांना शिरकाव देऊ नये. आपल्या अतिरिक्त आयुक्ता बंगला रिकामी करायला लावून बाहेरच्या शासकीय अधिकाऱ्यांना बंगला देऊ नये असे राजा यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community