राज्यातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे या पुरस्काराचे पाहिले मानकरी ठरले आहेत.
साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रामध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याच धर्तीवर यावर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत यंदापासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा यांना देण्यात येईल. याशिवाय महिला, मराठी उद्योजक व अन्य एका उद्योजकाला असे तीन पुरसकार देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis : महारेरा आणि महापालिकेला डिजीटलने जोडणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती)
रतन टाटा यांची कारकीर्द
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला. वास्तुविशारद बनण्याचे रतन टाटा यांचे बालपणीचे स्वप्न होते. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनी टाटा होते. नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचे धाकटे सुपुत्र. त्यांनी रतन टाटा यांना दत्तक घेतले होते. टाटा उद्योग समूह हा भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. त्याला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे. ते आजही टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community