तुळशी, विहार,तानसापाठोपाठ मोडकसागर तलावही भरले

पाणी साठा कमी, तरीही चिंता नसावी

326
तुळशी, विहार,तानसापाठोपाठ मोडकसागर तलावही भरले

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तुळशी, विहार आणि तानसा या तलावांपाठोपाठ मोडकसागर तलावही गुरुवारी (२७ जुलै) रात्री सुमारे अकरा वाजता ओसंडून भरुन वाहू लागले. त्यामुळे एकूण सात तलावांपैकी चार तलाव भरले आहेत. ही मुंबईकरांसाठी खुशखबर असली तरी मुंबईला ६० टक्क्यांहून अधिक पाणी पुरवठा करणार्‍या भातसा तलावांमध्ये अद्यापही ५२ टक्के एवढाच पाणी साठा जमा झाला आहे. चार तलाव भरले असले तरी एकूण पाणी साठ्याच्या केवळ ६१टक्केच पाणी साठा जमा झाला आहे. तरीही चिंता करण्याचे कारण नसून अशाच प्रकारे १ ऑक्टोबर पर्यंत साडे चौदा लाख दशलक्ष लिटर पाण्याचा साठा जमा होईल आणि मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवता येईल असा अंदाज जल अभियंता विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मागील आठ दिवसांपासून ठाणे तसेच, नाशिक भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (२६ जुलै) तानसा आणि विहार तलाव भरले. त्यानंतर गुरुवारी रात्री मोडक सागर तलावही भरले. दरवर्षी मोडक सागर तलाव प्रथम भरते आणि त्यानंतर तानसा तलाव भरले जाते. परंतु यावर्षी तानसा तलाव पहिले भरले, त्यानंतर दुसर्‍या दिवशी मोडक सागर भरले.

New Project 2023 07 28T090321.372

(हेही वाचा – खान्देश आणि अधिकमास : पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती)

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मात्र, २७ जुलै २०२३ रोजी यासर्व तलावांमध्ये ८लाख ९१ हजार २७४ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही पाणी साठा कमीच असून याच दिवशी मागील वर्षी ८८.२८ टक्के एवढा पाणीसाठा होता, तर २०२१ मध्ये या सर्व तलावांत ६८.२२ टक्के एवढा पाणीसाठा होता.

मोडक सागर धरणात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या तीन दिवसांत हे धरण भरेल असा अंदाज ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने वर्तवला होता. त्यानुसार दोनच दिवसात हे धरण भरून वाहू लागले.

२७ जुलै पर्यंतचा पाणी साठा

२०२३ : ८ लाख ९१हजार ३७४ दशलक्ष लिटर्स (६१.५८ टक्के)

२०२२: १२ लाख ७७हजार ७८७दशलक्ष लिटर्स (८८.२८टक्के)

२०२१: ९ लाख २७ हजार ३३५ दशलक्ष (६८.२२ टक्के )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.