Manipur Violence : आता सीबीआय करणार मणिपूर महिला अत्याचाराचा तपास

या प्रकरणाची सुनावणी राज्याबाहेर आसाममध्ये होणार

177
Manipur Violence : आता सीबीआय करणार मणिपूर महिला अत्याचाराचा तपास

मणिपूरमध्ये (Manipur Violence) 3 मे 2023 रोजी कुकी जमातीच्या महिलांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहे. तसेच याप्रकरणाची सुनावणी राज्याबाहेर आसाममध्ये होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच 19 जुलै रोजी मणिपूरमध्ये महिलांवर (Manipur Violence) झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ समोर आला होता. आता या व्हिडीओचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, ज्या मोबाईलमधून तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, तो फोन जप्त करून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्या फोनच्या तपासात अनेक गोष्टी उलगडू शकतात.

मणिपूरमधील हिंसाचार (Manipur Violence) अद्याप शमलेला नाही, त्यामुळे सैन्य, सीआरपीएफ आणि सीएपीएफचे 35 हजार अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मेईतेई वर्चस्व असलेल्या खोऱ्यातील भाग आणि कुकी प्राबल्य असलेल्या डोंगराळ भागांमध्ये एक बफर झोन तयार केला आहे. याशिवाय, भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत मणिपूर-मिझोराम सीमेवर 10 किलोमीटर लांबीचे कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण सीमेवर काटेरी तारा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(हेही वाचा – Karnataka : “काँग्रेसच्या राज्यात जिहादी फोफावले”; आमदार अतुल भातखळकरांची जहरी टीका)

मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि म्यानमार यांच्या सीमेवर दोन्ही देशांतील लोक 40 किलोमीटरपर्यंत मुक्तपणे येऊ शकतात असा करार आहे. अशा परिस्थितीत, म्यानमारमधून आलेला एखादा व्यक्ती अवैधरित्या भारताचा नागरिक बनू नये, यासाठी सरकारकडून बायोमेट्रिक स्कॅन करण्यात येईल. हे बायोमेट्रिक स्कॅन थेट आधारच्या नोंदीशी जोडले जाईल, जेणेकरून असे लोक भारताचे बनावट नागरिक होऊ शकणार नाहीत. भारत-म्यानमार सीमेवर लवकरात लवकर काटेरी तारा लावण्यात याव्यात, असे आदेश देखील केंद्र सरकारने दिले आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार, मणिपूरमधील (Manipur Violence) जातीय हिंसाचारात आतापर्यंत 150 मृत्यू झाले आहेत. तर 502 जण जखमी झाले आहेत. 6065 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. 361 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी 209 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मणिपूरमध्ये आतापर्यंत 101 कोटी रुपयांच्या मदत साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.