सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात (Heavy Rain) मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे काही भागांतील जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. तर मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.
मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस
मुंबईसह (Heavy Rain) उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(हेही वाचा – Pune-Mumbai Expressway : महामार्गावर दरड कोसळल्यामुळे दोन तासांचा ब्लॉक)
रत्नागिरीत भूस्खलन
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कोंढरणमध्ये एका घरावर दरड कोसळली आहे. सततच्या पडणा-या मुसळधार (Heavy Rain) पावसामुळे येथे भुस्खलन झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेमुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. खबरदारी म्हणून कोंढरण गावातील ५० घरातील ८० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
पालघरमध्ये जनजीवन ठप्प
पालघर जिल्ह्यात देखील पावसाचा (Heavy Rain) जोर कायम आहे. त्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दुर्गम भागातील काही रस्त्यांवर तर चार फुटापर्यंत पाणी साचले आहे. पालघरमधील सूर्या नदीलाही मोठा पूर आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community