Manipur Violence : सीबीआयकडून १० जणांना अटक

प्रकरणाचा तपास हाती घेताच अटकसत्र सुरू

129
Manipur Violence : सीबीआयकडून १० जणांना अटक

मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणी सीबीआयकडून तपासाला सुरुवात झाली असून आरोपींच्या अटकेची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत ६ तक्रारी नोंदवल्या असून १० जणांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकणात देखील तक्रार नोंदवण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Monsoon Diseases : पावसाळी आजारांचा प्रतिबंध करण्याचे व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही उपाय)

याप्रकरणी (Manipur Violence) आज, शुक्रवारी (२८ जुलै) सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (२७ जुलै) रोजी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते. त्या प्रतिज्ञापत्रात या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण प्रक्रिया ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत असे देखील केंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.

या प्रकणार (Manipur Violence) सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारवर ताशेरे देखील ओढले होते. तसेच अशा प्रकारच्या घटना सहन करण्या पलिकडच्या आहे. त्यामुळे जर केंद्र आणि राज्य सरकारने यावर तात्काळ काही कारवाई केली नाही तर आम्ही या प्रकरणावर योग्य तो निर्णय घेऊ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ताकीद दिली होती. दरम्यान महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकणी मणिपूरमध्ये (Manipur Violence) सीबीआयचा तपास सुरु करण्यात आल्याचं केंद्र सरकारच्या वतीने सर्वेच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे. परंतु, व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा तपास सीबीआयने औपचारिकपणे हाती घेतलेला नाही. तर या प्रकणात मणिपूर पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एकूण ८ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान गृह मंत्रालयाने सचिव अजय कुमार भल्ला यांच्यामार्फत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मणिपूर प्रकरणातील ट्रायल रन ही मणिपूर बाहेर करण्यात यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.