Opposition Alliance Meeting : ‘या’ दिवशी मुंबईमध्ये होणार विरोधी आघाडीची तिसरी बैठक

143
Opposition Alliance Meeting : 'या' दिवशी मुंबईमध्ये होणार विरोधी आघाडीची तिसरी बैठक
Opposition Alliance Meeting : 'या' दिवशी मुंबईमध्ये होणार विरोधी आघाडीची तिसरी बैठक

इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) या नव्याने स्थापन झालेल्या विरोधी पक्षांच्या विरोधी आघाडीमध्ये सर्वच पक्षांमध्ये समन्वय साधणे गरजेचे आहे. संसदेत मांडलेल्या केंद्र सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावाबद्दल देखील विरोधकांमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजधानीतील राजकीय वर्तुळात सुरु आहे. यामुळे पुढे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीवर सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे.

इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) या नव्याने स्थापन झालेल्या विरोधी आघाडीची तिसरी बैठक २५ ते २६ ऑगस्ट दरम्यान मुंबईत होणार आहे. मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. यामध्ये ११ सदस्यीय समन्वय समितीही अंतिम केली जाणार आहे. त्यात काँग्रेस, टीएमसी, डीएमके, आप, जेडीयू, आरजेडी, शिवसेना (यूबीटी), एनसीपी, झारखंड मुक्ती मोर्चा, समाजवादी पार्टी आणि सीपीआय (एम) यांचा प्रत्येकी एक सदस्य असेल.

(हेही वाचा – Monsoon Diseases : पावसाळी आजारांचा प्रतिबंध करण्याचे व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही उपाय)

महायुतीत समाविष्ट असलेल्या अन्य छोट्या पक्षांना समितीत स्थान मिळणार नाही. नवीन आघाडी स्थापनेनंतर ही पहिलीच वेळ आहे की ज्या राज्यात त्यांचा एकही सदस्य सत्तेत नाही अशा राज्यात सर्व २६ विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. खरे तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित गट) यांचे सरकार आहे. यापैकी कोणीही I.N.D.I.A. चा भाग नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.