iPhone 14 : आयफोनसाठी दाम्पत्याने विकले 8 महिन्याचे बाळ

175
iPhone 14 : आयफोनसाठी दाम्पत्याने विकले 8 महिन्याचे बाळ

पश्चिम बंगालच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील एका दाम्पत्याने महागडा (iPhone 14) आयफोन विकत घेण्यासाठी स्वतःच्या 8 महिन्यांच्या बाळाची विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली असून वडील फरार झाले आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार आरोपी जयदेव घोष आणि त्याच्या पत्नीला इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याचा नाद आहे. ऍपल-14 (iPhone 14) या अत्याधुनिक आयफोनवर रिल्स बनवाव्यात अशी या दाम्पत्याची इच्छा होती. परंतु, हा फोन अतिशय महाग असल्यामुळे या दाम्पत्याने आपल्या 8 महिन्यांच्या बाळाची विक्री करून आयफोन खरेदी केला. परंतु, घोष कुटुंबियांच्या वागण्यात काही विचित्र बदल संबंधित शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांचे बाळ अनेक दिवसांपासून बेपत्ता होते, तरीही पालकांनी कोणतीही हालचाल दाखवली नाही. तसेच त्यांच्या हातात आयफोन 14 (iPhone 14) पाहून शेजाऱ्यांचा संशय जास्तच वाढला. कारण त्या आयफोनची किंमत साधारण एक लाखांच्या जवळपास होती. शेजाऱ्यांना या जोडप्याच्या आर्थिक परिस्थितीची आधीच कल्पना होती. अशा परिस्थितीत अचानक आयफोन-14 (iPhone 14) विकत घेणं कसं परवडलं याबाबत त्यांच्या मनात शंका आली.

(हेही वाचा

संबंधित घटनेच्या संदर्भात बाळाच्या आईशी संवाद साधल्यावर, तिने शेवटी कबुली दिली की तिने आणि तिच्या पतीने आयफोन विकत घेण्यासाठी पैसे उभे करण्यासाठी आपले बाळ विकले होते. तिने सांगितले की, ते या आयफोनवरून इंस्टाग्राम रील्स बनवत होते. ज्यामध्ये बंगालच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा प्रवास दाखविण्यात आला होता. याहूनही धक्कादायक बाब समोर आली आहे की, आपल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी वडिलांनी आपल्या ७ वर्षांच्या मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बाळाला विकत घेणाऱ्या आईवरही मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास अद्याप सुरू असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास घेत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.