दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात एका 47 वर्षीय प्राध्यापकाने सहप्रवासी असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना 26 जुलै रोजी घडली. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या तक्रारीवर आरोपी प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, त्यानंतर तत्काळ आरोपीला जामीन देखील मंजूर करण्यात आला.
यासंदर्भातील माहितीनुसार पाटणा येथे राहणाऱ्या रोहित श्रीवास्तव आणि पिडीत तरुणीची सीट बाजूबाजूला होती. बुधवारी (26 जुलै) रोजी पहाटे 5.30 वाजता हे विमान दिल्लीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण विमान मुंबईत उतरण्यापूर्वीच आरोपीने मुलीचा विनभंग केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपीने या चुकीच्या हेतून स्पर्श केल्याचा पिडीतेचा आरोप आहे. आरोपीने स्पर्श केल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद जास्तच वाढल्यावर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, विमानाच्या लँडिंगनंतर अधिकारी या दोघांनाही सहार पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेव्हा आरोपीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. तसेच या मुलीचा जबाबही पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
(हेही वाचा – Nigerian Gang : मुंबई, नवी मुंबईतून कोट्यवधींच्या ड्रग्जसह नायजेरियन टोळ्यांना अटक)
आरोपीच्या विरोधात कलम 354 आणि 354 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सध्या आरोपीला जामीन मिळाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community