कितीही आडकाठी आणा, मुंबई पालिकेतील पालकमंत्री कार्यालय बंद करणार नाही – मंगलप्रभात लोढा

193
कितीही आडकाठी आणा, मुंबई पालिकेतील पालकमंत्री कार्यालय बंद करणार नाही - मंगलप्रभात लोढा
कितीही आडकाठी आणा, मुंबई पालिकेतील पालकमंत्री कार्यालय बंद करणार नाही - मंगलप्रभात लोढा

विरोधकांनी कितीही आडकाठी आणली, तरी जनकल्याणासाठी मुंबई महापालिकेतील पालकमंत्री कार्यालय सुरूच राहील, अशा शब्दांत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवार, २८ जुलै रोजी विरोधकांनी फटकारले.

काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लोढा म्हणाले, आजवर फक्त पालकमंत्र्यांसाठी उघडी असणारी मुंबई महापालिकेची दारे, आज आमच्या निर्णयाने जनतेसाठी खुली झाली. कोणीही स्थानिक जनप्रतिनिधी महानगरपालिकेच्या कार्यालयात येऊ शकत नाही, नागरिकांच्या समस्या वॉर्ड ऑफिस मध्ये अडकून राहतात, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी दाद मागायला मंत्रालयत जाण्यासाठी सुद्धा परवानगी लागते, हे सर्वच लक्षात घेऊन आम्ही जनतेच्या सोयीसाठी पालकमंत्री समस्या निवारण कक्ष उभा केला तर त्यामध्ये काय अडचण आहे? असा सवाल लोढा यांनी विधानसभेत उपस्थित केला.

(हेही वाचा – Hindusthan Post Impact : मायग्रेशन सर्टिफिकेट देणारी वेबसाईट अखेर सुरू)

हे कार्यालय फक्त जनकल्याणासाठी असून, येथे कोणतेही राजकीय कार्य होणार नाही. या कक्षामध्ये सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचे स्वागत आहे. या कार्यालयाला कितीही विरोध झाला तरी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू राहील. आम्ही हे कार्यालय जनतेच्या हितासाठी सुरू केले असून, त्यांच्या समस्या सोडवणे एवढाच या कार्यालयाचा उद्देश आहे. जे या निर्णयाचा विरोध करत आहेत, त्यांनी हे सुद्धा विचारले पाहिजे की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार व मुंबई शहरचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांना राहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील हायड्रॉलिक इंजिनियरचा बंगला कोणत्या उद्देशाने दिला होता?”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.