Heavy Rain : उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ

170
Heavy Rain : उजनी धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ

सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात (Heavy Rain) मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे काही भागांतील जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. तर मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.

दरम्यान उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे (Heavy Rain) व पुणे जिल्ह्यातून येत असलेल्या पाण्यामुळे सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

(हेही वाचा – Opposition Alliance Meeting : ‘या’ दिवशी मुंबईमध्ये होणार विरोधी आघाडीची तिसरी बैठक)

सध्या उजनी धरणाची पाणीपातळी (Heavy Rain) वजा १४.२० टक्के एवढी आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उजनी धरण प्लसमध्ये येणार आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि परिसरात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतातील पिकांना चांगले जीवदान मिळत आहे. दरम्यान, उजनी धरणात येणारा दौण्ड विसर्ग १९ हजार क्युसेकवर पोहोचला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.