आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी साजरा केला जातो. वाघांच्या प्रजातीचे संरक्षण करण्याची गरज आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दुर्दैवाने वाघांना असंख्य धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यात अधिवास नष्ट होणे, शिकार करणे आणि वाघांच्या अवयवांचा अवैध व्यापार यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त, विविध संस्था, सरकार आणि वन्यजीव संरक्षक जनजागृती मोहीम, शैक्षणिक कार्यक्रम आणि व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येतात. हा दिवस वाघांसमोरील आव्हाने अधोरेखित करण्यासाठी, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी, शिकार व बेकायदेशीर व्यापार थांबवण्यासाठी आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी साजरा केला जातो.
इतिहास
वाघांची संख्या कमी होऊ नये यासाठी जनजागृती करणे हे आंतरराष्ट्रीय जागतिक व्याघ्र दिनाचे मुख्य उद्धिष्ट आहे. २०१० मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. वाघांच्या संख्येत घट होण्यामागे अधिवास नष्ट होणे, हवामान बदल आणि शिकार हे काही घटक कारणीभूत आहेत. या प्रजातींच्या संवर्धनासोबतच त्यांच्या अधिवासांचे संरक्षण आणि विस्तार करण्याचाही या दिवसाचा उद्देश आहे. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्था देखील आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करतात.
जंगल नष्ट होणे आणि हवामान बदलामुळे वाघांची संख्या कमी होत आहे. शिकारी आणि अवैध व्यापार हा देखील वाघांसाठीचा मोठा धोका आहे. वाघांची हाडं, कातडी आणि शरीराच्या इतर अवयवांच्या मागणीमुळे शिकार आणि तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
(हेही वाचा – Atul Save : गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागा नाही! गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची कबुली)
वाघांच्या संख्येवर नकारात्मक परिणाम करणारा आणखी एक धोका म्हणजे जंगल नष्ट होणे. संपूर्ण जगात, आपण प्रवेशाचे मार्ग, मानवी वस्ती, लाकूडतोड, वृक्षारोपण आणि शेती यांमुळे वाघांचे अधिवास नष्ट होत असल्याचे पाहत आहोत. खरं तर, वाघांच्या मूळ निवासस्थानांपैकी फक्त ७ टक्के आज अबाधित आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community