मुंबईतील प्रकल्प रस्त्यांवरच घडतेय अधिक खड्डे दर्शन

231
मुंबईतील प्रकल्प रस्त्यांवरच घडतेय अधिक खड्डे दर्शन

मुंबईमध्ये मुसळधार पावसातही पाणी तुंबण्याचे प्रमाण यंदा कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात या पावसामुळे पुन्हा एकदा खड्डयांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आजही शंभरच्या वर खड्डे असल्याची तक्रारींची नोंद घेणाऱ्या संगणक प्रणालीवर दिसून येत आहे. विशेष म्हणजे ज्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटसाठी कंत्राटदारांची निवड केली आहे, त्याच प्रकल्प रस्त्यांवर विशेषत: खड्डे दिसून येत आहे. त्यामुळे प्रकल्प रस्त्यांवरील खड्डे ना नियुक्त कंत्राटदार भरत ना महापालिकेचे अधिकारी ते खड्डे भरत. प्रकल्प रस्त्यावर खड्डे पडल्यास ते बुजवण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची असून त्यांनी हे खड्डे न भरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून महापालिकेच्यावतीने हे खड्डे बुजवून त्याचाही खर्च कंत्राटदाराच्या देयकातून वजा करण्याची तरतूद आहे.

New Project 2023 07 29T181538.188

यंदाच्या पावसाळ्यात मागील काही दिवसांमध्ये एकाच दिवशी २०० हून मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला असून जुलै महिन्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. २४ जूनपासून २१ जुलै या कालावधी चार वेळा २०० मि. मीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांची स्थिती चांगली असली तरी तसेच पावसाळ्यापूर्वी खराब रस्त्यांची डागडुजी केल्यामुळे काही प्रमाणात खड्डे दिसून येत नसले तरी अनेक रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे अशा काही रस्त्यांची माहिती काढल्यानंतर असे कळते हे रस्त्यांच्या विकास करण्यात येणार असून पावसाळ्यानंतर या रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे कंत्राटदार नियुक्त रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्त कंत्राटदाराची आहे. परंतु अनेक कंत्राटदारांकडून या रस्त्याची पावसाळ्यात काळजी घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे.

New Project 2023 07 29T181510.103

(हेही वाचा – Terrorists : पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या निशाण्यावर ‘चाबड हाऊस’?; पोलीस यंत्रणा सतर्क)

मुंबईतील घाटकोपर पंतनगरचा संपूर्ण परिसरच आता खड्डयात बुडाला असून येथील नायडू कॉलनीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे याच रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी मागील मार्च महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. परंतु या कंत्राटदाराकडून हे खड्डे बुजवून रस्त्याचा विकास होईपर्यंत पावसाळ्यात काळजी घेतली जात नाही की महापालिका रस्ते विभागातील अधिकारी या रस्त्यावरील खड्डे बुजवत नाही. त्यामुळे पंतनगरमधील रहिवाशांना आजही खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे.

New Project 2023 07 29T181643.884

याचप्रमाणे शहरातील दादर भागांमध्ये ज्ञान मंदिर मार्गावर मागील अनेक दिवसांपासून खड्डे पडलेले या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठीही महापालिकेचे अधिकारी पुढाकार घेत ना संबंधित कंत्राटदार. याबरोबरच पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ पोलिस स्थानकाच्या समोरील बाजुस जुहू तारा रोडवरही खड्डयांचे सम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे खड्यांचा रस्ता अशीच याची ओळख निर्माण झाली आहे. याबरोबरच मालाडला केदारमाल रोडवर चंद्रपुरी इमारतीच्यासमोर तसेच मालाड पूर्व निवेटिया कंपाऊस परिसरातील रस्ते, याबरोबरच राणी सती मार्गावरही खड्डे पडलेले आहेत. मुंबईतील या खड्डयांबाबत महापालिकेकडे तक्रारींचा पाऊस पडत असून आतापर्यंत ३९९ खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ३२४ खड्डे बुजवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील २७१ खड्डे बुजवल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे आजही १०६ खड्डे अद्यापही बुजवले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

New Project 2023 07 29T182002.369

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.