Blood Donors : मुंबईतील शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान

सर्व निरोगी व्यक्तींनी नियमितपणे रक्तदान करावे, रक्तदानामुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचवू शकतात.

166
Pune Porsche Accident: आरोपींची रक्त तपासणी 'इन कॅमेरा' होणार, वैद्यकीय विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Pune Porsche Accident: आरोपींची रक्त तपासणी 'इन कॅमेरा' होणार, वैद्यकीय विभागाने दिली महत्त्वाची माहिती

सर्व निरोगी व्यक्तींनी नियमितपणे रक्तदान करावे, रक्तदानामुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचवू शकतात. रक्तदान हे एक सामाजिक कार्य आहे, सर्वांनी न चुकता रक्तदान करा, असे आवाहन मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटीचे एम-डॅक्सचे संचालक आणि मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी केले आहे. या कार्यक्रमाला अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, सहाय्यक संचालिका अपर्णा पवार, रक्त केंद्र अधिकारी, समुपदेशक आणि समाज विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभाग व मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीद्वारे सातत्याने दरवर्षाला जनजागृती मोहिमांचे व रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या रक्तदान मोहिमेत शतकवीर मुंबईकर रक्तदात्यांचा सन्मान मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल नियंत्रण सोसायटीच्या वतीने करण्यात आला.

(हेही वाचा – महसूल सप्ताहानिमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे – राधाकृष्ण विखे पाटील)

केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि प्रसिद्ध गेस्ट्रॉएन्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर अविनाश सुपे, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी, संजय डोबके, संजय लवांडे, गजानन नार्वेकर, डॉ. प्रगती वाझा, प्रशांत म्हात्रे, गणेश आमडोसकर, राजेंद्र कुलकर्णी, संतोष केळकर, विलास घाडीगावकर, मनीष सावंत, संतोष मिश्रा, किरण राजूरकर, विश्वेश लेले, हिरोस खंबाटा, विठ्ठल शितोळे, तरुण भगत, सतीश सावंत आणि दिव्या चंडोक यांना सन्मानित करण्यात आले. रक्तदानाबरोबरच अवयवदान, देहदान, प्लेटलेट आणि नेत्रदानासाठी देखील पुढाकार घेणे आणि अधिकाधिक व्यक्तींना यात सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे रमाकांत बिरादार यांनी सांगितले. सर्व रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत इतरांना रक्तदानास पुढाकार घेण्यास प्रेरणा द्या, असे आवाहन एम-डॅक्सचे विजय करंजेकर यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.