उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. यूपी एसटीएफने माफिया अतिक अहमदचा वकील विजय मिश्रा याला लखनऊमधून अटक केली आहे. उमेश पाल हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. उमेश पालचे लोकेशन शूटर्सना शेअर केल्याचा आरोप विजय मिश्रावर आहे.
विजय मिश्रा यांच्यासोबत हयात हॉटेलमध्ये थांबलेल्या महिलेबाबत माहिती गोळा केली जात आहे. या संदर्भात पोलीस तपास सुरु आहे. महिलेचे माफिया अतिकशी थेट संबंध असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र, तसे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. विजय मिश्राबाबत असाही दावा केला जात आहे की, 15 एप्रिलला अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येच्या रात्री तो कोल्विन हॉस्पिटलबाहेर उपस्थित होता.
15 एप्रिल रोजी रात्री 10:35 च्या सुमारास प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटल परिसरात तीन हल्लेखोरांनी अतिक आणि अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या केली. तिन्ही हल्लेखोर मीडिया कर्मचाऱ्यांच्या वेशात हॉस्पिटलच्या परिसरात पोहोचले होते. अतिक अहमदच्या नावाने खंडणी मागितल्याप्रकरणी विजय मिश्रा यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा Accident : पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; २ पोलिसांचा जागीच मृत्यू)
वकील विजय मिश्रावर खंडणी मागितल्याचा आरोप
प्रयागराजमधील प्लाय व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी वकील विजय मिश्रा यांच्यावर याआधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय वकिलाचे अतिकच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याचं बोललं जात आहे. उमेश पाल खून प्रकरणात अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिचा शोध सुरु आहे. तिला शोधणाऱ्यासाठी 50 हजार रुपयांचं बक्षीस देखील घोषित करण्यात आलं आहे. आतापर्यंत यूपी पोलिसांना तिला पकडण्यात यश आलेलं नाही. विजय मिश्राला ताब्यात घेतल्यानंतर
Join Our WhatsApp Community